मुक्ताईनगर शहरातील सौ तु ल कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर येथे पाच दिवसांचा गणेशोत्सव आनंदमय व उत्साही वातावरणात साजरा मुक्ताईनगर प्रतिनिधी सत...
मुक्ताईनगर शहरातील सौ तु ल कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर येथे पाच दिवसांचा गणेशोत्सव आनंदमय व उत्साही वातावरणात साजरा
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतिश गायकवाड
(संपादक : हेमकांत गायकवाड)
गणेश चतुर्थी दिवशी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे मॅडम यांच्या हस्ते गणेश मूर्तीची स्थापना झाली.शाळेतील कला शिक्षिका श्रीमती प्रणिता चौधरी मॅडम यांनी शाडूमातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीची शाळेत स्थापना करून पर्यावरण पूरक वातावरणाला उत्तेजन दिले गेले.पाच दिवसात शाळेमध्ये गणेशोत्सवानिमित्त मुलांच्या रंगभरण स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धेसह शिक्षकांची ही संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली .शाळा समिती अध्यक्ष श्री पुरुषोत्तम भाऊ महाजन तसंच संस्था सदस्य महेश भाऊ पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राध्यापक सतीश गायकवाड सर यांच्या हस्ते आरती करण्यात आली.पाचव्या दिवशी शाळा ते बस स्टॅन्ड पर्यंत गणपतीची मिरवणूक काढून लेझीम ढोल पथकासह गणपतीला अखेरचा निरोप देण्यात आला .शाळेत मुलांना प्रसाद म्हणून बुंदी व मोदक वाटप झाले.शाळेतील गणेशोत्सवासाठी संस्था चेअरमन आदरणीय एडवोकेट रोहिणी ताई खडसे ,सचिव डॉक्टर सी एस दादा चौधरी ,व्हाईस चेअरमन श्री नारायण दादा चौधरी यांनी भेट देऊन मुलांचा आनंद द्विगुणित केला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेतील उपशिक्षक कार्यक्रम प्रमुख श्री अनिल चौधरी यांनी केले सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी उत्साहात गणेशोत्सवात सहभाग दिला.

No comments