नशिराबाद येथे ‘श्री गणेशा आरोग्य अभियाना’ ला मोठा प्रतिसाद; १२५ नागरिकांची मोफत तपासणी! नशिराबाद प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) नशिरा...
नशिराबाद येथे ‘श्री गणेशा आरोग्य अभियाना’ ला मोठा प्रतिसाद; १२५ नागरिकांची मोफत तपासणी!
नशिराबाद प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
नशिराबाद (प्रतिनिधी): जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या सूचनेनुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्मान आरोग्य मंदिर, नशिराबाद अंतर्गत येथे विशेष आरोग्य शिबीर आणि "सेवा संकल्प अभियान" मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नशिराबाद गावातील 'उंच आड गणेश मंडळ' येथे आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये प्रामुख्याने ३० वर्षांवरील नागरिकांची बिगर-संसर्गजन्य आजार (NCD) अंतर्गत मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये १२५ नागरिकांची बीपी आणि शुगर तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये ३ नागरिकांना उच्च रक्तदाब (BP) असल्याचे निदान झाले. तसेच इतर किरकोळ आजारी रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. तपासणीसोबतच नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी योगासने, राष्ट्रीय पोषण आहार आणि सध्याच्या ऋतूत पसरणाऱ्या जलजन्य व कीटकजन्य आजारांविषयी (डेंग्यू, मलेरिया, चिकूनगुनिय) सखोल आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले.सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी- डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते, डॉ. अमन पटेल, आरोग्य सेविका:- श्रीमती बफी साळुंके, आरोग्य सेवक:- श्री सुनील गोविंद ढाके, आशासेविका- सुवर्णा पाटील, अरुणा पाटील, मदतनीस:- शुभदा जैन आणि १०२ रुग्णवाहिकेचे चालक:- श्री. राजेंद्र पाचपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी स्थानिक नगरसेवक
श्री मनोज चंद्रकांत पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी केशव खुशाल पाटील, विनोद चंद्रकांत पाटील, योगेश रमेश माळी व सर्व सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले



No comments