चोपडा नगर परिषदेतर्फे महिला बचत गटांसाठी योग ध्यान सत्र शिबिर चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा नगरपरिषद सेवा संकल्प अभियाना...
चोपडा नगर परिषदेतर्फे महिला बचत गटांसाठी योग ध्यान सत्र शिबिर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपरिषद सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्ग बचतगटातील महिलांसाठी चोपडा शहर उपजीविका केंद्र चोपडा नगर परिषद येथे बचत गटातील महिलांसाठी योग ध्यान सत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्ष नम्रताताई पाटील व मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक समूह संघटक अरुण राजपूत यांनी केले शहर अभियान व्यवस्थापक गणेश पाठक यांनी बचत गटातील महिलांना पंतप्रधान आत्मनिर्भर निंधी योजनायाचा लाभ शहरातील छोटे व्यवसायिक व बचत गटातील महिलांनी घ्यावा त्यांनी योग प्रात्याक्षिक करून दाखवले तसेच प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विद्यालय ओम शांती सेंटर चोपडा येथील शितल दीदी यांनी ध्यान साधना यावर महिलांना मार्गदर्शन केले योग साधनाचा अनुभव सर्वांना करून दाखवला व जीवन जगण्यासाठी संयम सहन शिलता व योग साधना याच महत्व सर्वांना समजावून सांगितल.सदर कार्यक्रमात उपमुख्य अधिकारी संजय मिसार हजर होते.शहर समन्वयक अजिंक्य शिंपी यांनी बचत गटातील महिलांनी घरकुलां चा लाभ घ्यावा यावर मार्गदर्शन केले.शहर उपजीविका केंद्राच्या समन्वयकसंदीपा देशमुख व सहाय्यक घनश्याम वैदय कार्यक्रमासाठी परीक्षा घेतले.



No comments