adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पत्रकारांना किंवा साहित्यिकांना गाव गाडा किंवा सहकारी संस्था चालवण्या संधी द्या प्रदीप पाटील

पत्रकारांना किंवा साहित्यिकांना गाव गाडा किंवा सहकारी संस्था चालवण्या संधी द्या प्रदीप पाटील मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता. चोपडा  (संपादक : हे...

पत्रकारांना किंवा साहित्यिकांना गाव गाडा किंवा सहकारी संस्था चालवण्या संधी द्या प्रदीप पाटील




मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता. चोपडा 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


आज पर्यंत बघतोय सरकार ज्या काही सहकारी संस्था किंवा ग्रामचायत सारख्या संस्था कार्यकाळ मुदत संपल्यावर प्रशासक नेमणूक करते. प्रशासकीय अधिकारी हा त्या त्या संस्थेत असतोच सरकार त्यांच्याचं कडे कारभार सोपवत असते. हे अत्यन्त चुकीचं असुन त्यांच्यावर अंकुश कोणाचाच राहतं नाही एकटा एकट्यानं सर्व कारभार बघणं सरकारच्या मर्जीने असंच झालं. काही प्रशासक हे मनमर्जीने कारभार करतात असं बहुतेक ठिकाणी गावोगावी निदर्शनास येते. मग ती ग्रामपंचायत असो वा विविध कार्यकारी, दुध संस्था इ. अनेक सहकारी संस्था.जो अधीकारी ग्रामसेवक किंवा सेक्रेटरी यांच्याच कडे मुदत संपल्यावर पदभार दिला जातो हेच मुळात चुक आहे. ग्रामसेवक सरकारी पद आहे त्याला अंकुश किंवा देखरेख हा सरपंच करतो. सरपंच ची जागा ग्रामसेवक एकटा कसा घेऊ शकतो. त्याच्यावर देखरेख हि सरपंच पद खालसा किंवा मुदत बाह्य झाली असेल तर त्या ठिकाणी ग्रामसेवक सोबत गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पत्रकार साहित्यिक जे गावातीलच असतात. त्यांना गावाची माहिती असते हुशार असतात. निवडणूकच्या भानगडीत सहसा साहित्यिक पत्रकार लोकं पडतं नाहीत. कारण समाजसेवा हेच त्यांचं व्रत असते. सत्याचा आवाज ते बनतं असतात. गावाचा विकास एकट्या अधिकारी च्या हातात गेल्याने खुंटतो असं माझं निरीक्षण आहे. एकट्याची सही ने तो अपहार करु शकतो म्हणूनच त्याच्यावर अंकुश साठी आणि सरपंच सारख्या किंवा त्याहून चांगल्या योजना राबविण्या करता निस्वार्थी अश्या पत्रकार साहित्यिक व्यक्ती कडे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी सरपंच किंवा संस्था चेअरमन च्या जागी सरकारी नेमणूक झाली पाहिजे. नवीन निवडून आलेली व्यक्ती येते तोवर. तज्ञ संचालक सारखं तज्ञ सरपंच तज्ञ चेअरमन म्हणून अल्प चार सहा महिने साठी नेमणूक झाली पाहिजे.निवडून येणारं नवं संचालक मंडळ स्थापन होतं निवडणूक होते तोवर. ह्याच लोकांना का तर साहित्यिक पत्रकार यांना गावाची संपुर्ण माहिती असते निस्पृह पद्धतीने गाव उन्नती करिता सरकार ने मुदत संपलेल्या संस्था किंवा ग्रामपंचायत येथे प्रशासक म्हणून पदभार दिला पाहिजे.

गावकी भावकी च्या गावातील हेवेदावे सोडवण्याचं काम गावातील पत्रकार साहित्यिक बऱ्याच अंशी करतं असतात म्हणून सुशिक्षित गावातील होतकरू चांगल्या पत्रकार व्यक्तिमत्व गावासाठी काही करु पाहत असेल तर सरकारने आपली गावची संस्था, ग्रामपंचायत नोकरशाई च्या हातात सत्ता देण्या पेक्षा गावातीलच पत्रकार किंवा साहित्यिक व्यक्तिमत्व यांच्याकडे गावागाडा चालवण्या साठी दिला पाहिजे.अखिल भारतीय गामीण पत्रकार संघ तर्फे तशी मागणी होतं आहे. त्या मागणीला सर्वच पत्रकार संघटना आणि साहित्यिक संघटना पाठिंबा देताय. पत्रकार संघटना प्रतिनिधी म्हणून आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून स्वतः या मागणीला पाठिंबा देतोय. तरी आमच्या या पत्रकार,साहित्यिक मागणीची सरकार ने योग्य दखल घेतं. या पुढे निवडणूक मुदत संपली कि प्रशासक म्हणून पत्रकार किंवा साहित्यिक हुशार गुणवंत लोकांची शासनाने नेमणूक प्रशासक म्हणून केली पाहिजे.



प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर जळगाव 

मो. 9922238055

No comments