पीएम श्री साने गुरुजी विद्यालयात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे जयंती उत्साहात साजरी यावल प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) यावल येथील पी...
पीएम श्री साने गुरुजी विद्यालयात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे जयंती उत्साहात साजरी
यावल प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
यावल येथील पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकनियुक्त नगराध्यक्षा तथा शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. छायाताई पाटील तसेच माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री. अतुल पाटील, विद्यमान नगरसेविका सौ. वैशालीताई बारी, श्री. सागर चौधरी, शालेय समिती सचिव तथा मुख्याध्यापक श्री. एम. के. पाटील सर, उपप्राचार्य श्री. ए. एस. इंगळे सर, पर्यवेक्षक श्री. व्ही. ए. काटकर सर, पर्यवेक्षक श्री. व्ही. टी. नन्नवरे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. एस. फेगडे सर, श्री. पी. एन. सोनवणे सर यांच्या उपस्थितीत प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. कविता कोलते मॅडम यांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर तसेच समाजप्रबोधनासाठी त्यांनी केलेल्या कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एम. के. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री. अतुल पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उत्सव समिती प्रमुख प्रा. सौ. स्नेहल वाणी मॅडम यांनी केले.

No comments