adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या धिरज पांडेला बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांचा मदतीचा हात

  रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या धिरज पांडेला बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांचा मदतीचा हात नालासोपारा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत...

 रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या धिरज पांडेला बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांचा मदतीचा हात




नालासोपारा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


नालासोपारा  : विरार येथे राहणाऱ्या धिरज पांडे यांचा काही वर्षापूर्वी रेल्वे अपघातात दोन्ही पाय निकामी झाले. ऐन तरुण वयातच पाय गेल्याने जगायचं की आत्महत्या करायची असा प्रश्न त्याला पडला होता.

त्यांच्या पायावरून लोकलचे चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली त्यात त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले.

अनेकांनी त्यावेळी मदत केली. पण ती मदत आयुष्यभर टिकणारी नव्हती. म्हणूनच त्यांने आपल्या हिंमतीवर उभा राहण्याचे ठरविले. 

अनेक वर्षे वारंवार फेरया मारून ही दिव्यांग प्रमाणपत्र व दिव्यांग पेन्शन साठी कुठूनही मदत होत नसल्याने त्यांनी बहुजन विकास आघाडी चा रूचिता नाईक यांना संपर्क करताच त्यांना १०़ दिवसात दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले. 

व दिव्यांग पेन्शन सुरु करून देण्यात आली. लवकरच त्यांना उपजिविकेसा़ठी दिव्यांग स्टॉल व मोफत व्हिल चेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शुल्लक कारणाने जीवन संपवणारे अनेक तरुण आपण पाहतो. पण जीवघेणा अपघात झाला असताना त्याचं भांडवल करुन आयुष्य जगण्यापेक्षा संघर्ष करणारा धिरज हा अनेकांना प्रेरणा देत आहे.

धिरज याच्यावर नियतीने घाला घातला असला तरीही त्याला पुन्हा स्वतः च्या पायावर उभे करण्याची जबाबदारी बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांनी घेतली आहे.

No comments