adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दुष्काळी मदतीसाठी चांदूर बिस्वा येथे शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

  दुष्काळी मदतीसाठी चांदूर बिस्वा येथे शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन चांदूर बिस्वा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चांदूर बिस्वा : शेतकऱ्य...

 दुष्काळी मदतीसाठी चांदूर बिस्वा येथे शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन





चांदूर बिस्वा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

चांदूर बिस्वा : शेतकऱ्यांना दुष्काळी मदत म्हणून हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे, मागील वर्षीचा तसेच चालू वर्षीचा प्रलंबित पीक विमा तात्काळ अदा करण्यात यावा आणि ई-पिक पाहणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चांदूर बिस्वा येथील मंडळ अधिकारी यांच्या दालनात एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पाटील यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार मरकंड साहेब यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. मात्र, मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला.

No comments