लासुर येथिल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न विश्राम तेले चौगाव ता.चोपडा (संपादक : हेमकांत गायकवाड) चौगाव:...
लासुर येथिल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
विश्राम तेले चौगाव ता.चोपडा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चौगाव:- येथून जवळच असलेल्या लासुर येथिल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन योगेश दगडू वाघ यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत संपन्न झाली यावेळी संस्थेचे सचिव नारायण शिवराम पाटील यांनी संस्थेच्या अहवाल वाचन तसेच तेरीज ताळेबंद चे वाचन केले.संस्थेच्या गेल्या तीन वर्षांपासून चा एकूण नफा जवळ जवळ 33 लाख रुपये झाला असून या नफ्याची वाटणी करून उर्वरित रक्कम सभासदांना लाभांश स्वरूपात जवळपास दहा टक्के लाभांश वितरीत करण्यात यावे असा ठराव यावेळी पारीत करण्यात आला यावेळी नम्रता पॅनल प्रमुख अमृतराव वाघ तसेच ए.के .गंभीर सर यांच्या सह संस्थेचे व्हा.चेअरमन नौमिल पठाण, संचालक सुरेश माळी, डॉ.अरुण देसले, प्रकाश माळी, अशोक बाविस्कर, जगन्नाथ महाजन युवराज बाविस्कर,बाळु सोनवणे, महेंद्र पाटील, संदिप मगरे,श्रीमती जिजाबाई वाघ, तसेच तज्ञसंचालक राजेंद्र माळी, दिलीप पालीवाल हे उपस्थित होते यावेळी चर्चेत शंकर महाजन, गोविंद माळी, गोकुळ पाटील,देविलाल बाविस्कर, विक्रम माळी,आर.एन.पवार, विकास पाटील,प्रविण मगरे, हिंमतराव माळी, चंद्रकांत वाघ , जिभू टेलर ,तुषार वाघ,सुनील पाटील यांच्या सह सभासदांनी संस्थेच्या प्रगती बाबतीत प्रश्न विचारले व त्यांना यावेळी समर्पक उत्तर देण्यात आली तसेच आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करताना संस्थेचे माजी चेअरमन हिंमतराव महाजन यांनी संस्थेच्या सुरू असलेल्या बांधकामाबाबत माहिती विचारली असता आता पर्यंत झालेल्या खर्चाचे विवरण सचिव यांनी वाचून दाखवले व सभासदांनी समाधान व्यक्त केले संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत संपन्न झाली यावेळी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन योगेश नारायण वाघ यांनी केले तसेच संस्थेचे कर्मचारी नंदलाल पाटील, विनोद मगरे, हर्षल पाटील यांनी परीश्रम घेतले

No comments