adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासुर येथे संगीतमय शिवमहापुराण कथा

लासुर येथे संगीतमय शिवमहापुराण कथा  ह भ प दिनेश महाराज कंचनपुरकर विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी) (संपादक : हेमकांत गायकवाड) लासुर ता.चोपडा ये...

लासुर येथे संगीतमय शिवमहापुराण कथा 


ह भ प दिनेश महाराज कंचनपुरकर



विश्राम तेले (चौगाव प्रतिनिधी)

(संपादक : हेमकांत गायकवाड)


लासुर ता.चोपडा येथे पाताळेश्वर महादेव मंदिर आयोजित संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन दिनांक २८सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.रात्री ८.३०ते १०.३० ह भ.प. दिनेश महाराज कंचनपूरकर हे शिव कथाकार शिव महात्म्य कथेचे विवेचन करणार आहेत. मागच्या वर्षी लासुर ग्रामस्थांनी या कथेचे निरूपण ऐकल्यानंतर परत आयोजकांनी इंदिरानगर या भागात या कथेचे आयोजन केलेले आहे. दि.५ऑक्टोबर रोजी सकाळी ८. ते ११ ह.भ.प.दिनेश महाराज कांचनपूरकर यांचे काल्याचे किर्तन होईल.११ते३ महाप्रसाद घेण्यात येईल. भाविकांनी उपस्थित रहावे व संगीतमय शिवमहापुराण कथा श्रवण करावी,असे आवाहन शिव महापुराण कथा समितीचे अध्यक्ष समाधान कोळी, उपाध्यक्ष रावसाहेब सोनगिरे, सुरेश महाजन सचिव, सदस्य ,नंदलाल पाटील ,भालचंद्र पाटील, देविदास माळी ,भगवान महाजन, योगराज माळी ,सुरेश पाटील ,रवींद्र कोळी ,राहुल कोळी ,पप्पू पाटील ,महेंद्र माळी ,राहुल माळी ,पिंटू माळी ,सचिन माळी ,मनोहर धोबी

No comments