adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या प्रदेश पदावर तसेच विविध जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदावर नियुत्या

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या प्रदेश पदावर तसेच विविध जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदावर नियुत्या मुक्ताईनग...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या प्रदेश पदावर तसेच विविध जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदावर नियुत्या





मुक्ताईनगर /जळगाव प्रतिनिधी किरण धायले

(संपादक : हेमकांत गायकवाड)


आपणास सोपविण्यात आलेली जबाबदारी ही केवळ एक पद नसून, ओबीसी समाजाच्या सामाजिक न्यायाच्या हक्कांसाठी, संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी आणि काँग्रेसच्या विचारधारेच्या प्रसारासाठी कार्य करण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे.


महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना पुढे नेत, संघटन मजबूत करण्यासाठी, तळागाळातील कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आपण सर्वजण निष्ठेने व एकजुटीने कार्य कराल, असा विश्वास आहे.


आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होवो आणि ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा संघर्ष अधिक व्यापक व प्रभावी होवो, हीच सदिच्छा.


सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेछूक.महाराष्ट्र प्रदेश भटक्या, विमुक्त जाती जमाती (VJNT) विभागाचे प्रदेश सचिव अनिल वाडीले.

No comments