अंतुर्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले (संपादक ...
अंतुर्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे रक्तदान शिबिर उत्साहात; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आज अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला गावातील नागरिक व रुग्णांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हे शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पार पडले. डॉ. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, "रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपल्या एका रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाचा अमूल्य जीव वाचू शकतो," असे प्रतिपादन केले.
या उपक्रमासाठी आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरादरम्यान अंतरली गावातील ग्रामस्थ मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच आरोग्य केंद्रात उपस्थित असलेल्या रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी स्वयंप्रेरणेने पुढे येऊन रक्तदान केले.
रक्तदात्यांचे आरोग्य पथकातर्फे आभार मानण्यात आले व त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

No comments