adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीरामपूरच्या पत्रकारांचा ऐक्याचा निर्धार मराठी पत्रकार संघ, श्रीरामपूरच्या अध्यक्षपदी करण नवले, ॲड. बाळासाहेब आगे कार्याध्यक्ष

श्रीरामपूरच्या पत्रकारांचा ऐक्याचा निर्धार मराठी पत्रकार संघ, श्रीरामपूरच्या अध्यक्षपदी करण नवले, ॲड. बाळासाहेब आगे कार्याध्यक्ष शौकतभाई शेख...

श्रीरामपूरच्या पत्रकारांचा ऐक्याचा निर्धार

मराठी पत्रकार संघ, श्रीरामपूरच्या अध्यक्षपदी करण नवले, ॲड. बाळासाहेब आगे कार्याध्यक्ष



शौकतभाई शेख/ श्रीरामपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


शहर व तालुक्यातील पत्रकारांमध्ये शहरी- ग्रामीण, छोटे-मोठे तसेच प्रिंट-इलेक्ट्रॉनिक माध्यम असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्व पत्रकारांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार केला. श्रीरामपूर येथील व्ही.आय.पी. विश्रामगृहात झालेल्या बैठकीत मराठी पत्रकार संघ, श्रीरामपूरच्या अध्यक्षपदी दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस संघाचे मार्गदर्शक रमेश कोठारी, नागेश सावंत, सुनील कुलकर्णी तसेच संस्थापक अध्यक्ष प्रदीप आहेर उपस्थित होते.

यावेळी संघाच्या कार्यकारी मंडळाचीही निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी दैनिक जय बाबाचे संपादक ॲड. बाळासाहेब आगे, उपाध्यक्षपदी मनोज आगे व महेश रक्ताटे, सचिवपदी सुरेश कांगुणे, खजिनदारपदी राहुल मुथा आणि संघटकपदी भाऊसाहेब काळे यांची एकमताने निवड झाली.

तसेच सहसचिवपदी सलीमखान पठाण, सहखजिनदारपदी सचिन उघडे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रदीप आहेर, सुनील कुलकर्णी, जयेश सावंत आणि पूनम करण नवले यांचा समावेश करण्यात आला.

नवनिर्वाचित अध्यक्ष करण नवले यांनी यावेळी बोलताना, पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांमध्ये समानतेची भावना अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली. पत्रकारितेची गरिमा आणि विश्वासार्हता जपतानाच पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे आवाज उठविणे, पत्रकारांसाठी प्रशिक्षण उपक्रम राबविणे तसेच शासनाच्या पत्रकारांसाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शहर असो अथवा ग्रामीण भाग, वर्तमानपत्र असो अथवा इलेक्ट्रॉनिक मीडिया, छायाचित्रकार असो व जाहिरात प्रतिनिधी, प्रत्येक पत्रकार हा संघटनेचा समान घटक आहे. पत्रकारांच्या हितासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम केले पाहिजे, असे आवाहन नवले यांनी केले.

यावेळी पत्रकार संतोष बनकर, देविदास देसाई, साईनाथ बनकर, दिलीप तांबे, नितीन चित्ते, महेश देशपांडे, दिलीप दायमा, किशोर साळुंके, मंगेश लबडे, अमोल कदम, जयराज रणदिवे, सुधीर लोळगे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. संघाच्या नव्या कार्यकारिणीचे उपस्थित पत्रकारांनी अभिनंदन करून आगामी काळात श्रीरामपूर तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


वृत्त विशेष सहयोग

पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 956117411

No comments