adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांची पालक सभा उत्साहात संपन्न."

चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांची पालक सभा उत्साहात संपन्न." चोपडा तालुका प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत ...

चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांची पालक सभा उत्साहात संपन्न."


चोपडा तालुका प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


श्री. शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,(इंजीनिअरिंग  अँड पॉलीटेक्निक), चोपडा येथे दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०२६ रोजी प्रथम वर्ष विभागातील विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.


या पालक सभेत महाविद्यालयाचे मा. प्राचार्य श्री. व्ही. एन. बोरसे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवण्याची गरज, मोबाईलच्या वापराचा अभ्यासावर होणारा परिणाम आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मानसिक विकासासाठी पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी प्रा. एम. एस. पाटील यांनी पालक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. पी. के. चौधरी यांनी केले. पालक सभेस प्रथम वर्ष विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालयाशी सातत्याने समन्वय ठेवण्याची भूमिका व्यक्त केली.

पालक, विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्यातील सुसंवाद व समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही पालक सभा उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.

No comments