adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हिसका निसर्गाचा, मार बाजाराचा! चिंचोलीत भावाअभावी उभ्या कोथिंबिरीवर फिरवला रोटर; शेतकरी आर्थिक संकटात.

हिसका निसर्गाचा, मार बाजाराचा! चिंचोलीत भावाअभावी उभ्या कोथिंबिरीवर फिरवला रोटर; शेतकरी आर्थिक संकटात लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) संपादक :...

हिसका निसर्गाचा, मार बाजाराचा! चिंचोलीत भावाअभावी उभ्या कोथिंबिरीवर फिरवला रोटर; शेतकरी आर्थिक संकटात



लातूर, जि. प्र. (उत्तम माने )

संपादक : हेमकांत गायकवाड 

निलंगा : निलंगा तालुक्यातील चिंचोली सा निसर्गाने मारले आणि बाजाराने झोडपले, अशा दुहेरकटात सापडलेल्या बळीराजाचे अश्रू पुन्हा एकदा बांधावर ओघळले आहेत. पावसाने अचानक दिलेल्या उघडिपीमुळे पिकांची अवस्था बिकट झाली असतानाच, बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने अखेर हताश होऊन चिंचोली सायखान शिवारातील शेतकऱ्याने हातातोंडाशी आलेल्या कोथिंबिरीवर थेट रोटर फिरवून पीक मातीमोल केले.

स्थानिक शेतकरी दत्ता गोविंद पिटले यांनी सायखान शिवारात मोठ्या कष्टाने आणि भांडवल ओतून कोथिंबिरीची लागवड केली होती. मात्र, ऐन भरात असताना पावसाने प्रदीर्घ खंड दिला, ज्यामुळे पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. उरलीसुरली कसर बाजारभावाने काढली. कोथिंबिरीची तोडणी, मजुरी आणि वाहतुकीचा खर्चही बाजारभावातून निघणे अशक्य झाल्याने पेटले यांनी डोळ्यांदेखत उभ्या पिकात ट्रॅक्टर घालून त्यावर रोटर फिरवल पावसाने उघड दिल्याने आधीच पिकांचे हाल झाले, त्यात बाजारात कोथिंबिरीला कवडीमोल भावही मिळेनासा झाला. तोडणीचा खर्चही खिशातून भरावा लागत असल्याने अखेर छातीवर दगड ठेवून उभ्या पिकात रोटर फिरवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. या नुकसानीमुळे मोठा आर्थिक फटका बसला असून कुटुंब चालवायचे कसे, हा प्रश्न समोर ठाकला आहे." दत्ता गोविंद पिटले (बाधित शेतकरी)बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीचा खर्च पूर्णपणे वाया गेला. बाजारातील नीचांकी दरांमुळे शेतातील माल तोडून बाजारात पाठवणेही तोट्याचे वाढता उत्पादन खर्च आणि कोसळलेले बाजारभाव यांमुळे शेतकरी कर्जबाजारीपणाच्या उंबरठ्यावर असून, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे

No comments