विटनेर जिल्हा परिषद शाळेला बँक व्यवस्थापक व माजी विद्यार्थ्यांची आर्थिक मदत शालेय उपक्रमांचे कौतुक; प्रत्येकी ५ हजार १०० रुपयांची मदत देत शा...
विटनेर जिल्हा परिषद शाळेला बँक व्यवस्थापक व माजी विद्यार्थ्यांची आर्थिक मदत
शालेय उपक्रमांचे कौतुक; प्रत्येकी ५ हजार १०० रुपयांची मदत देत शाळेशी ऋणानुबंध जपले
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक : हेमकांत गायकवाड)
विटनेर, ता. चोपडा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, विटनेर येथे शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देत सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा हातेडचे मॅनेजर श्री. हर्षल पंडितराव लाड यांनी दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी शालेय परिसर, विविध शालेय उपक्रम, माजी विद्यार्थी संघाची भूमिका तसेच भविष्यवेधी शिक्षण याबाबत माहिती घेतली.
शाळेत राबविण्यात येणाऱ्या Skills Based Education Planning तसेच व्यावसायिक शिक्षणाच्या उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी अभिनंदन केले. शाळेतून जाताना त्यांनी शाळेला आर्थिक मदत म्हणून ५ हजार १०० रुपयांची रोख भेट दिली.
दरम्यान, संत श्रावण बाबा यांचे वंशज तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, विटनेरचे माजी विद्यार्थी श्री. भरत सोमा कोळी यांनी दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी शाळेत भेट देत सेवा संकल्प अभियानाच्या औचित्याने ५ हजार १०० रुपयांची रोख मदत शाळेला दिली.
माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या विकासासाठी मिळणारे सहकार्य हे विद्यार्थ्यांसाठी तसेच शाळेसाठी प्रेरणादायी ठरत आहे. माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ होत असल्याचे यावेळी दिसून आले.
“माझी शाळा माझा अभिमान, माजी विद्यार्थी संघ आमचा स्वाभिमान” या भावनेतून शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदत करणाऱ्या श्री. हर्षल लाड व श्री. भरत कोळी यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
— आम्ही विटनेरकर


No comments