यावल येथे १५ कोटी खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन केन्द्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते संपन्न...
यावल येथे १५ कोटी खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन केन्द्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते संपन्न.
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे अखेर भाग्य जुळले असून येथील यावल शहरातुन जाणाऱ्या बुऱ्हाणपूर तळोदा या गुजरात आणी मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे १५ कोटी रुपये निधी खर्चाच्या ६ किलो मिटर पर्यंत रस्ता कामाचे भुमिपुजन शहरातील भुसावळ टी पाँईट च्या ठिकाणी आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात केन्द्रीय बाल कल्याण व क्रिडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी महायुतीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते . यावल शहरातील भुसावळ टी पॉईंट या ठिकाणी केन्द्रीय मंत्री केन्द्रीय रस्ते वाहतुक आणी महामार्ग मंत्री ना. नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनाने युवक कल्याण व क्रिडा मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते कुदळ मारून भुमिपुजन करण्यात आले, बायपासला जोडणाऱ्या चौपदरीकरणाच्या या हायब्रिड रस्त्याच्या कामास अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर सुरुवात झाल्याने तालुक्यातील नागरीकांमध्ये उत्साहाच्या वातावरण आहे . या भुमिपुजन कार्यक्रमास यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपुत, उप सभापती दिपक चौधरी,भाजपा जेष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी , कृउबाचे माजी सभापती हर्षल पाटील,भारतीय जनता पक्षा चे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन , माजी जिल्हा परिषद सदस्य आर जी पाटील ( नाना ),माजी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती रविन्द्र पाटील,भाजपा चे यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, किनगाव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील,यावल नगर पालीकेच्या गटनेत्या नंदाताई महाजन,नगर सेविका सौ कल्पना वाणी , नगरसेविका सौ वर्षा येवले, नगरसेविका नन्नवरे,कृउबाच्या संचालीका कांचन फालक , आदी कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते.

No comments