प्रभाग १० व ११ मध्ये मोतीबिंदू शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : शहरातील प्रभाग क्रमांक १० व ...
प्रभाग १० व ११ मध्ये मोतीबिंदू शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : शहरातील प्रभाग क्रमांक १० व ११ मधील नागरिकांसाठी मोतीबिंदू तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. केतकीताई पाटील यांच्या संयोजनातून, गोदावरी फाऊंडेशनच्या सहकार्याने आणि आमदार अमोल दादा जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिरासाठी प्रभाग क्रमांक १० मधील गटनेता तथा नगरसेविका सौ. नंदाताई राजेंद्र महाजन तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका सुभांगी येवले व नगरसेविका सविता नान्नवरे यांनी विशेष पुढाकार घेतला.
शिबिरात नागरिकांची मोतीबिंदू तपासणी करून आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी भाजप सोशल मीडिया प्रभारी व्यंकट बारी यांचीही उपस्थिती होती. नागरिकांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांनीही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे स्वागत केले.

No comments