अहिल्यानगर सरपंच सेवा संघातर्फे श्री.प.पु जगदगुरु स्वामी अरुणनाथगीरीजी महाराज यांना उत्कृष्ट कीर्तनकार पुरस्कार प्रदान शौकतभाई शेख / श्रीर...
अहिल्यानगर सरपंच सेवा संघातर्फे श्री.प.पु जगदगुरु स्वामी अरुणनाथगीरीजी महाराज यांना उत्कृष्ट कीर्तनकार पुरस्कार प्रदान
शौकतभाई शेख / श्रीरामपूर :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.दिपालीताई प्रविण फरगडे यांचे सासरे कै.बाबुराव फरगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर सरपंच सेवा संघातर्फे विविध मान्यवरांना पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.दिपालीताई प्रविण फरगडे यांचे सासरे कै. बाबुराव फरगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त श्री.प.पु जगदगुरु स्वामी अरुणनाथगीरीजी महाराज यांच्या संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा भैरवनाथनगरसह पंचक्रोशीत ग्रामस्थांनी लाभ घेतला. या कार्यक्रमामध्ये माजी.आ. भाऊसाहेब कांबळे , सिद्धार्थ मुरकुटे, निमगांव खैरीचे सरपंच झुरळे पाटील, दिघीचे सरपंच अनिता जाधव , शितल पठारे सरपंच भोकर, सागर मुठे ,सरपंच मुठेवाडगांव, कमलपूर सरपंच सचिन मुरकुटे, यांच्या हस्ते श्री.प.पु जगदगुरु स्वामी अरुणनाथगीरीजी महाराज यांना उत्कृष्ट कीर्तनकार पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांनाही अहिल्यानगर सेवा संघातर्फे आदर्श आरोग्यमित्र पुरस्कार देण्यात आला. तसेच भैरवनाथनगर गावातील भजनी मंडळाला खादी ग्रामोद्योगचे संचालक प्रविण फरगडे यांच्याकडून टाळ, पेटी अशा विविध वस्ती भेट म्हणून देण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भाजप प्रवक्ते बबन मुठे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, कामगार तलाठी राजेश घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लबडे, कांता शेळके , बेबी फरगडे, विमल थोरात , ज्योती लाहोरे , सतिश जाधव, राजेंद्र पठाडे, नगरसेवक आशिष धनवटे, दीपक चव्हाण , सौ. प्रणिती चव्हाण, रवी पाटील, योगेश जाधव , बिट्टू कक्कड, दीपक वमने,वैशाली चव्हाण आदी नगरसेवकांसह ह.भ.प. ऋषिकेश महाराज, शिवा मेडिकल ट्रस्टचे हरिचंद्र बापूसाहेब, सचिन जगताप, खंडू सदाफळ, रोहन डावखर, पत्रकार प्रदीप आहेर, रवी भागवत, संतोष मते, महेश माळवे, अनिल पांडे आदी पत्रकार उपस्थित होते रत्नाकर कोरडे, आकाश गव्हाणे, राजेंद्र फरगडे, राजेंद्र कोकणे, बाळासाहेब गायकवाड , संतोष भागडे, आबासाहेब फरगडे, आकाश थोरात, प्रदीप नरोडे, सूतगिरणीचे माजी संचालक मुरलीधर पाटील शेळके आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकोलकर सर यांनी केले.
----------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments