adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात नवनाथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न चोपडा तालुक्यासह धरणगाव, जळगाव व यावल येथील सेवेकऱ्यांची उपस्थिती

  श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात नवनाथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न चोपडा तालुक्यासह धरणगाव, जळगाव व यावल येथील सेवेकऱ्यांची उपस्थिती  चोपड...

 श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात नवनाथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न

चोपडा तालुक्यासह धरणगाव, जळगाव व यावल येथील सेवेकऱ्यांची उपस्थिती 


चोपडा प्रतिनिधी 

संपादक हेमकांत गायकवाड 

चोपडा : बजरंग नगर, चोपडा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी एकदिवसीय नवनाथ पारायण सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागासह धरणगाव, जळगाव व यावल येथून मोठ्या संख्येने सेवेकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

सायंकाळी ७ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत अखंडपणे नवनाथ पारायण करण्यात आले. या भक्तिमय सोहळ्याचा तब्बल ४२१ सेवेकरी बंधू-भगिनींनी लाभ घेतला. संपूर्ण रात्र भक्तिमय वातावरणात पारायण, नामस्मरण व सेवेमध्ये व्यतीत झाली.


यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाविषयी केंद्रप्रमुख बापूसो. आर. बी. पाटील यांनी उपस्थित सेवेकरी बंधू-भगिनींना मार्गदर्शन केले. सेवा, साधना, संस्कार आणि अध्यात्मिक प्रगती याबाबत त्यांनी मार्गदर्शन करत सेवा मार्गातील विविध उपक्रमांचे महत्त्व विशद केले.

या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नवनाथ पारायणाच्या निमित्ताने विविध ठिकाणांहून आलेल्या सेवेकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.

No comments