adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायतीच्या रस्त्यांच्या कामांच्या मापात पाप? पैसे घेऊन कामांची 'एमबी' वाढवल्याचा बांधकाम अभियंत्यावर आरोप! गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी दखल घेणार का?

मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायतीच्या रस्त्यांच्या कामांच्या मापात पाप? पैसे घेऊन कामांची 'एमबी' वाढवल्याचा बांधकाम अभियंत्यावर आरोप! ग...

मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायतीच्या रस्त्यांच्या कामांच्या मापात पाप?

पैसे घेऊन कामांची 'एमबी' वाढवल्याचा बांधकाम अभियंत्यावर आरोप!

गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी दखल घेणार का?




रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


रावेर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, बांधकाम अभियंता सुनील वानखेडे यांच्याविरुद्ध विकासकामांच्या मापन पुस्तिकेतील (एमबी) नोंदी वाढवून देताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गभीर आरोप करण्यात आला आहे.


प्रत्यक्षात कमी काम झालेले असतानाही कंत्राटदारांकडून पैसे घेऊन कागदोपत्री कामाचे प्रमाण अधिक दाखविले जात असल्याचा दावा मोठा वाघोदा ग्रामपंचायत सदस्य शेख चाँद शेख नबी ऊर्फ कालू मिसतरी यांनी केला आहे. संदर्भात त्यानी बुधवार, २ सप्टेंबर रोजी रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

दाखल केली आहे. रावेर पंचायत समितीअंतर्गत विविध गावांमध्ये गेल्या काही वर्षात लाखो रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाच्या नियमानुसार मापन पुस्तिकेत नोंद करणे ही संबंधित बांधकान अभियंत्याची जबाबदारी असते. मात्र, अभियंता सुनील वानखेडे हे शासकीय नियमांचे पालन न करता प्रत्यक्ष झालेल्या कामापेक्षा अधिक काम दाखवून मापन पुस्तिकेत नोंदी करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या नोंदी करताना कंत्राटदार व संबंधितांकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचा दावाही तक्रारदाराने केला आहे. सुनील वानखेडे हे जवळपास २० वर्षांपासून रावेर पंचायत समितीत कार्यरत असल्याची माहिती तक्रारदाराने दिली आहे. दीर्घकाळ एकाच ठिकाणी


कार्यरत असल्याने संबंधित कंत्राटदार व मध्यस्थांशी त्यांचे लागेबांधे निर्माण झाल्याचा आरोपही तक्रारीत करप्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होण्यासोबतच निकृष्ट दर्जाच्या कामांनाही कागदोपत्री मान्यता मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. परिणामी गावांच्या निकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कत्राटदारावरही अन्याय होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


वानखेडे यांच्या कार्यकाळात मोठा वाघोदा तसेच रावेर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रावेर तालुक्यातील अन्य गावांमध्ये झालेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून मापन पुस्तिकेतील नोंदी आणि प्रत्यक्ष काम यांची पडताळणी करावी, अशी मागणी मोठा वाघोदा ग्रामपंचायत चे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शेख चाँद

शेख नबी ऊर्फ कालू मिसतरी यांनी केली आहे. या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास सबचित अभियंत्याविरुद्ध कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गटविकास । अधिकाऱ्यांकडे केली आहे.


दरम्यान, या तक्रारीमुळे रावेर तालुक्यातील पंचायत समितीच्या बाधकाम विभागाच्या कामकाजाबाबत शौचालय घोटाळा पुनरावृत्ती ची?पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तक्रारीतील आरोपांची प्रशासनाकडून चौकशी होते का आणि त्यानंतर कोणती कारवाई केली जाते, याकडे ग्रामस्थांसह संबंधितांचे लक्ष लागले आहे. संबंधित अभियंता किंवा पंचायत समिती प्रशासनाची या आरोपांबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी रावेर पंचायत समितीत २०वर्षापासून ठाण मांडून बसलेले बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या बाबतीत काय निर्णय घेतात याकडे मोठा वाघोदा येथील सुज्ञ नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत!

No comments