पी एम श्री जि प उर्दू बॉईज शाळा क्रं १ रावेर येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; शाळेचा प्रेरणादायी उपक्रम इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपूर ...
पी एम श्री जि प उर्दू बॉईज शाळा क्रं १ रावेर येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; शाळेचा प्रेरणादायी उपक्रम
इदू पिंजारी प्रतिनिधी फैजपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
रावेर पी. एम.श्री. जि. प. उर्दू शाळा क्र. १, रावेर येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नियमित अभ्यास करावा, यासाठी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक मो. आरिफ सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
“शिक्षणाची ज्योत प्रत्येकाच्या हातात, उज्ज्वल भविष्याच्या वाटेवर!” या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक अ. सलाम सर रईस सर युनूस सर अजिज सर विकार सर मुख्तार सर गुलरेज सर अजहर सर इरफान सर नावेद सर इमरान सर अंशकालीन शिक्षक अजहर सर कयाम सर वसीम सर उपस्थित होते

No comments