adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खिर्डी येथे घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार निंभोरा पोलीसांच्या कचाट्यात. घरफोडीचे ३ गुन्हे उघडकीस 6,16,810/-लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

खिर्डी येथे घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार निंभोरा पोलीसांच्या कचाट्यात. घरफोडीचे ३ गुन्हे उघडकीस 6,16,810/-लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत राव...

खिर्डी येथे घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार निंभोरा पोलीसांच्या कचाट्यात. घरफोडीचे ३ गुन्हे उघडकीस 6,16,810/-लाख किंमतीचा मुद्देमाल हस्तगत





रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनचे हद्दीतील खिर्डी येथे राहणाऱ्या महिला शेहनाज शेख अख्तर या आपल्या परीवारासह बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दि. 13/09/2026 ते दि. 14/09/2026 दरम्यान फिर्यादी यांचे घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण 6,32,810/- रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कमची चोरी केली होती. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 186/2026 भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331(3), 331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांनी सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याबाबत तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या.


पोलिसांची कारवाई व आरोपींना अटक गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास चक्रे फिरवत पोलिसांनी गोपनीय


माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका आरोपीतास मुंबई येथून व चार आरोपींना खिर्डी ता. रावेर येथून ताब्यात घेऊन एकूण पाच आरोपींना अटक केली. 1) नवाज शेख शरीफ वय 23 वर्षे, 2) अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख रमजान वय 32 वर्षे, 3) शहादत बेग रफिक बेग वय 22 वर्षे, 4) चेतन लिलाधर जाधव वय 29 वर्षे, 5. शाकीब बेग साबीर बेग वय 32 वर्षे सर्व रा. खिर्डी खु।। ता. रावेर यांना अटक करण्यात आली आहे.


मुद्देमाल जप्ती आणि अतिरिक्त गुन्ह्यांचा उलगडा तपास पथकाने सखोल चौकशी करून गुन्ह्यात संशयित आरोपी


नवाज शेख यास ताब्यात घेतले, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास नमूद गुन्ह्यात अटक केली. सदर आरोपीच्या पोलीस कोठडीदरम्यान त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा आरोपी शहादत बेग, अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख, शाकिब बेग, रा. खिर्डी यांचे साथीने केला असल्याचे सांगितले. अटकेतील आरोपीताकडून प्राप्त माहितीवरून तांत्रिक विश्लेषण करून तात्काळ पोलीस पथक मुंबई येथे पाठवून आरोपी शहादत बेग यास मुंबई येथून तसेच अशपाक ऊर्फ अट्ट्या व शाकीब बेग यांना खिर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात गेलेला माल 6,32,810/- रु.किं.चे सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम पैकी 5,79,310/- रु.किं.चे सोन्या-


चांदीचे दागिने (सोन्याची पोत, कानातील झुमके, अंगठ्या वगैरे, चांदीचे फुलतोडे, गुजऱ्या, बांगड्या, हातातील कडे) व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.


सदर संशयित आरोपी यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी खिर्डी गावात मूळ गुन्ह्याव्यतिरिक्त इतर दोन ठिकाणी देखील घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यात आणखी एक आरोपी चेतन जाधव यास निष्पन्न करण्यात आले व अटकेतील आरोपीतांकडून दोन्ही गुन्ह्यातील चोरीस गेलेला एकूण 1,77,400/-रु.किं.चे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम पैकी 37,500/- रु. किं.चे सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहेत (सोन्याच्या बाळ्या, चांदीच्या लक्ष्मी, शारदा, बालगोपाळ व गणेशाच्या चांदीच्या मूर्ती). सदर अटकेतील आरोपी यांच्याकडून तिन्ही घरफोडींच्या गुन्ह्यातील एकूण 6,16,810/- किंमतीचा मु‌द्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


तपास पथकाची यशस्वी कामगिरी मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. अनिल बडगुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक, निंभोरा पोलीस ठाण यांच्या नेतृत्त्वात तपास अधिकारी पोलीस उप-निरीक्षक ए. एम. ढाकणे, ममता आर. तडवी व पोलीस तपास पथकातील पोहेकों रिजवान पिंजारी, पोहेकों अविनाश पाटील, पोकों सुभाष शिंदे, पोकों परेश सोनवणे, पोकों किरण जाधव, पोकों सर्फराज तडवी व इतर पोलीस अंमलदार या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगीरी केली आहे. सदर अटकेतील आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

No comments