adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांच्या प्रयत्नांमुळे आरोग्य सेवेचा कायापालट जनतेचे आरोग्य सदृढ करण्यासाठी वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करणार – डॉ. रामदास मराड, जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांच्या प्रयत्नांमुळे आरोग्य सेवेचा कायापालट जनतेचे आरोग्य सदृढ करण्यासाठी वैद्यकीय सुविधा अधिक बळकट कर...

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांच्या प्रयत्नांमुळे आरोग्य सेवेचा कायापालट

जनतेचे आरोग्य सदृढ करण्यासाठी वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करणार – डॉ. रामदास मराड, जिल्हा शल्य चिकित्सक




 पालघर जिल्हा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 पालघर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी घेतलेले पुढाकार अत्यंत स्तुत्य ठरले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात झालेल्या गतिमान बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांचे मोठे कौतुक होत आहे.गेल्या काही महिन्यांत जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिकरण करण्यात येत आहेत.

गोरगरीब रुग्णांना औषधांसाठी बाहेर जावे लागू नये, यासाठी औषध साठ्याचे चोख नियोजन त्यांनी केले आहे. तसेच, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ थेट रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी पारदर्शकता आणली आहे. त्यांच्या या रुग्णस्नेही भूमिकेमुळे शासकीय रुग्णालयावरील जनतेचा विश्वास कमालीचा वाढला आहे. अनेक सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी समाजसेविका रुचिता नाईक जिल्हा शल्य चिकित्सकांच्या या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला आहे.

जनतेचे आरोग्य सदृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागात आवश्यक असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासोबतच आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्रात पालघर जिल्हाला अव्वल क्रमांकाचे जिल्हा बनविण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया, असे आवाहन डॉ. रामदास मराड यांनी केले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक (District Civil Surgeon) डॉ. रामदास मराड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य सेवेत झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 

जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाने दिलेल्या जाहीर केलेल्या सुविधा मिळाव्या यासाठी त्यांना प्रमाणपत्र मिळावे म्हणून जिल्हा ग्रामीण रूग्णालयात विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळवून देण्यात त्यांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद ठरली आहे.

No comments