adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे उद्घाटन

फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे उद्घाटन इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील धनाजी नाना महाविद...

फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे उद्घाटन




इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालय, हिंदी विभागाच्या वतीने दि. १५ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या हिंदी सप्ताहाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.


हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने ‘नशामुक्त भारत’ व ‘जल है तो कल है’ या विषयांवर रांगोळी स्पर्धा तसेच मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सप्ताहा दरम्यान वादविवाद, निबंधलेखन, सामान्यज्ञान, चित्रकला, काव्यवाचन, गीतगायन आणि शेरो-शायरी आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


रांगोळी स्पर्धेचे परीक्षण डॉ. उन्नती चौधरी व डॉ. सविता कलवले यांनी, तर मेहंदी स्पर्धेचे परीक्षण डॉ. सीमा बारी व डॉ. सरला तडवी यांनी केले.


यावेळी प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांनी हिंदी सप्ताहातील विविध स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. हरीश नेमाडे यांचे मार्गदर्शन लाभले.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हिंदी विभागातील प्रा कल्पना पाटील, प्रा ईश्वर ठाकूर, प्रा विजय सोनजे, डॉ. सतीश पाटील, प्रा. अर्चना वराडे, प्रा. आरती भिडे तसेच विभागातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. शेखर महाजन, अमित व भूषण पाटील यांनीही कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.

No comments