पर्यावरणपूरक पद्धतीने घरगुती गणेश विसर्जन; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश जळगाव प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) जळगाव : गणेशोत्सवाच्या...
पर्यावरणपूरक पद्धतीने घरगुती गणेश विसर्जन; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
जळगाव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव : गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्ती आणि श्रद्धेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने जळगाव येथील पवार कुटुंबीयांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरातील श्री गणेशमूर्तीचे विधिवत पूजन करून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशन कल्पेश राजेंद्र पवार व त्यांचे चिरंजीव राघवेंद्र पवार यांच्या हस्ते गच्चीवर पाण्याच्या टबमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
तसेच गणेशमूर्तीच्या पूजेनंतर निर्माण होणारे निर्माल्य प्लास्टिकच्या पिशवीचा वापर न करता कागदात व्यवस्थित गुंडाळून अर्पण करण्यात आले. या माध्यमातून प्लास्टिकचा वापर टाळण्यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला.
गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि आनंदाचा सण आहे. मात्र, त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण करणे हीदेखील आपली सामाजिक जबाबदारी आहे. ‘भक्तीही जपूया आणि निसर्गाचीही काळजी घेऊया’ या विचारातून पवार कुटुंबीयांनी केलेला हा छोटासा प्रयत्न पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!

No comments