adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताईनगर युवक काँग्रेस तर्फे पालकमंत्र्यांना निवेदन सादर महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री

मुक्ताईनगर युवक काँग्रेस तर्फे पालकमंत्र्यांना निवेदन सादर महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री  अंतुर्ली /मुक्...

मुक्ताईनगर युवक काँग्रेस तर्फे पालकमंत्र्यांना निवेदन सादर

महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री 





अंतुर्ली /मुक्ताईनगर प्रतिनिधी किरण धायले

(संपादक : हेमकांत गायकवाड)


पालकमंत्री गुलाबराव पाटील आज मुक्ताईनगर विधानसभेच्या दुष्काळग्रस्त भागात पाहणी साठी आले असता त्यांना युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.चेतन झनके यांचे नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या वतीने दुष्काळ संदर्भात ८ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मुक्ताईनगर तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा तातडीने पाहणी करून आवश्यकतेनुसार दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवा. पिकांचे प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी .तालुक्यातील गावांमध्ये संभाव्य पिण्याच्या पाणीटंचाईचा आढावा घेऊन टँकर ,विहीर अधिग्रहण, पाणीपुरवठा योजना व इतर पर्यायी उपायोजना वेळेस सुरू करण्यात यावे.जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक चारा छावण्या अथवा पर्यायी उपाय योजनांचा विचार करण्यात यावा. प्रसंगी उत्तर महाराष्ट्र इंटक काँग्रेसचे संजय पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, देवेश पाटील,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शेख आरिफ रब्बानी, विनेश चौधरी, अशोकभाऊ जाधव, उपस्थित होते. निवेदन स्वीकारताना पालकमंत्री महोदयांसह मुक्ताईनगर विधानसभेचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील उपस्थित होते.

No comments