प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुर्ली मार्फत श्री तुळजाभवानी गणेश मित्र मंडळ या ठिकाणी श्री गणेशा आरोग्याचा कार्यक्रम अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायल...
प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुर्ली मार्फत श्री तुळजाभवानी गणेश मित्र मंडळ या ठिकाणी श्री गणेशा आरोग्याचा कार्यक्रम
अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
दि. 21/09/2026अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे सदर कार्यक्रमांमध्ये खालील तपासण्या तसेच उपचार करण्यात आले.
१)गरोदर माता व बालके तपासणी
२)असंसर्गजन्य आजार तपासणी आणि उपचार
३)आयुष्मान कार्ड काढण्यात आले
४)आभा कार्ड काढण्यात आले
५)रक्त तपासणी करण्यात आली.
६) मोफत औषधोपचार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या वेळी डॉ.शैलेश पाटील, डॉ. वैभव देव , आरोग्य सेवक ठाकरे, बाविस्कर सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच आशा सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री तुळजाभवानी गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते परिसरातील महिला नागरिक यांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी अनिल वाडीले व शेख भैय्या शेख करीम, किरण धायले यांनी भेट देऊन डॉक्टर व प्रा. आ. केंद्राचे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

No comments