adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे बाबा रामदेवजी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

यावल येथे बाबा रामदेवजी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा यावल, तालुका प्रतिनिधी भरत कोळी  (संपादक : हेमकांत गायकवाड) वाल्मीकी मेहतर समाजाचे...

यावल येथे बाबा रामदेवजी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा





यावल, तालुका प्रतिनिधी भरत कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


वाल्मीकी मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री रामदेवजी महाराज यांची ६७४ वी जयंती यावल शहरात मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

येथील पद्मालय हॉल येथून सायंकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल शहरातील डॉ. कुंदन फेगडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, भुसावळ येथील मेहतर समाजाचे जमादार सुनील पवार, पल्लाजी घारू भुसावल, भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्या नंदाताई महाजन, नगरसेवक उमेश फेगडे, बाळासाहेब फेगडे, दिल रुबाब तडवी, पी. एस. सोनवणे सर, वस्ताद रूपचंदजी घारू, माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले, डॉ. निलेश गडे, मुकेश कोळी, अतुल चौधरी, संजय भोई यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते.

यानंतर डीजे, ढोल-ताशांच्या गजरात शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मिरवणुकीमुळे शहरात उत्साहाचे आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

६५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या आखाड्याचे प्रात्यक्षिक

यावल शहरातील श्रीरामनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज आखाडा हा शहरातील जुन्या आखाड्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. वस्ताद रूपचंदजी घारू यांनी सुमारे ६५ वर्षांपूर्वी या आखाड्याची स्थापना केली होती. कालांतराने हा आखाडा बंद पडला होता. मात्र, वस्ताद रूपचंद घारू यांनी पुन्हा आखाडा सुरू करून तरुणांना मार्गदर्शन करण्याचे कार्य हाती घेतले आहे.

जयंती उत्सवानिमित्त आखाड्यातील कलाकारांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. या चित्तथरारक प्रात्यक्षिकांना उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त दाद देत कलाकारांचे कौतुक केले.

वस्ताद रूपचंद घारू यांचा सत्कार

गेल्या ६५ वर्षांपासून आखाड्याची परंपरा जपून तरुण युवकांना मार्गदर्शन करणारे वस्ताद रूपचंद घारू यांचा जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रात्री सुमारे १० वाजता मिरवणुकीची सांगता रामदेव बाबा मंदिरात आरतीने करण्यात आली. यावेळी यावल नगरपालिकेचे शिक्षण सभापती पराग सराफ यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती उत्सव व मिरवणूक यशस्वी करण्यासाठी यावल शहरातील समस्त मेहतर समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. एस. सोनवणे सर यांनी केले.

No comments