adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिक्षक दिनानिमित्त श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान

 शिक्षक दिनानिमित्त श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) हा...

 शिक्षक दिनानिमित्त श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

हातेड, दि. ५ सप्टेंबर २०२६ : श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शालेय समितीचे चेअरमन व सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्या वतीने हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

यानंतर शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांचा गुणगौरव केला. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळते, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते, यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब नंदकिशोर भालचंद्र सोनवणे होते. प्रमुख उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भैय्यासो. शामसुंदर सोनवणे, उपाध्यक्ष हेमांगी जोशी, तसेच अनिल अमृतराव सोनवणे, चंद्रकांत भिकनराव सोनवणे, विकास जनकराव पाटील, जयंतीलाल बाविस्कर, किशोर कोळी यांच्यासह शालेय समिती व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनगर सर यांनी केले. पर्यवेक्षक पी. आर. बाविस्कर यांनी प्रास्ताविकातून शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. तर मुख्याध्यापक पी. सी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त झालेल्या या सन्मान सोहळ्यामुळे विद्यालयात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments