adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका; स्व. निखिल भाऊ खडसे विद्यालयात उत्साहात शिक्षक दिन साजरा

 विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका; स्व. निखिल भाऊ खडसे विद्यालयात उत्साहात शिक्षक दिन साजरा  प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपा...

 विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका; स्व. निखिल भाऊ खडसे विद्यालयात उत्साहात शिक्षक दिन साजरा 


प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर : स्वर्गीय निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदमय आणि शैक्षणिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला. इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध भूमिका साकारल्या.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत येत शाळेचे दैनंदिन कामकाज सांभाळले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे महत्त्व, शिक्षणाचे मूल्य आणि गुरू-शिष्य नात्याचे महत्त्व यावर मनोगते व भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या भूमिकांमुळे संपूर्ण शाळेचे वातावरण आनंद, उत्साह आणि उत्स्फूर्ततेने भारून गेले.

या उपक्रमात मुख्याध्यापकपदाची भूमिका ममता सतीश सावळे, तर उपमुख्याध्यापकपदाची भूमिका गुंजन निलेश भालेराव यांनी प्रभावीपणे पार पाडली. विद्यार्थ्यांनी जबाबदारीने पार पाडलेल्या या भूमिका सर्वांसाठी विशेष आकर्षण ठरल्या.

कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य श्री. व्ही. के. वडसकर सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षकाचे जीवनातील स्थान, शिक्षकांचे योगदान आणि गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे इंग्लिश डिपार्टमेंट हेड  श्री. सतीश गायकवाड यांनी प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या आयोजनाला व शिस्तबद्ध नियोजनाला पर्यवेक्षक श्री. स्वप्नील चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारत अनुभवलेले नेतृत्व, जबाबदारी आणि अध्यापनाचे महत्त्व हा शिक्षक दिनाचा विशेष ठरला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आनंदमय वातावरण यामुळे स्वर्गीय निखिल भाऊ खडसे सेमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला.

No comments