साकळी येथील २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या राहत्या घरात गळफास घेतल्याने मृत्यू; यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद यावल तालुका प्रतिनिधी भरत क...
साकळी येथील २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या
राहत्या घरात गळफास घेतल्याने मृत्यू; यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
यावल तालुका प्रतिनिधी भरत कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मनवेल, ता. यावल : साकळी येथील विनोद जीवन बडगुजर ऊर्फ सोन्या (वय २६) या अविवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (२२ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
पहाटेच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मित्रमंडळींनी विनोद याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती विनोदचे वडील जीवन बडगुजर यांनी यावल पोलिसांना दिली. त्यांच्या खबरीवरून यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकाँ अशोक सोनवणे, गणेश रोहील तपास करीत आहे.

No comments