adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगर परिषदेतर्फे २३ सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबिर ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांना रक्तदानाचे आवाहन

चोपडा नगर परिषदेतर्फे २३ सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबिर ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांना रक्तदानाचे आव...

चोपडा नगर परिषदेतर्फे २३ सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबिर

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांना रक्तदानाचे आवाहन




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


‘रक्तदान—श्रेष्ठ दान’ या सामाजिक भावनेतून सेवा संकल्प अभियानांतर्गत चोपडा नगर परिषदेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांसह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


हे रक्तदान शिबिर बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे स्थळ चोपडा नगर परिषदेतील विद्युत विभागाजवळील ओपन गॅलरी असे आहे.


रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, एका रक्तदात्याच्या योगदानामुळे गरजू व्यक्तीला जीवनदान मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, आरोग्य सभापती श्री. रमेश शिंदे यांच्या सौजन्याने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यास बॅकपॅक (Backpack) सप्रेम भेट देण्यात येणार आहे. त्यामुळे नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments