adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तोंडपूर येथे जिल्हा कॅरम स्पर्धा

  तोंडपूर येथे जिल्हा कॅरम स्पर्धा जळगांव प्रतिनिधी : लियाकत शहा  (संपादक : हेमकांत गायकवाड) स्वर्गीय कासम शेख यांच्या स्मरणार्थ, जळगाव जिल्...

 तोंडपूर येथे जिल्हा कॅरम स्पर्धा



जळगांव प्रतिनिधी : लियाकत शहा 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


स्वर्गीय कासम शेख यांच्या स्मरणार्थ, जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात तोंडपूर येथे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता होईल.


स्पर्धेच्या विजेत्यांना एकूण ₹१४,००० चे रोख पारितोषिक मिळेल. या पारितोषिकांसाठी ज्ञानेश्वर पाटील, शरद पवार, दत्तात्रय कांडजे, नटुबा जाधव, जया फोटो, सलमान शेख, जमील पठाण आणि मुक्ताई कृषी केंद्र, तोंडपूर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.

आयोजकांनी जिल्ह्यातील कॅरम खेळाडूंना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मंजूर खान आणि राष्ट्रीय विजेता सय्यद मोहसीन यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आयोजक रंगनाथ पाटील यांनी या स्पर्धेचे नियोजन केले आहे. स्थानिक कॅरम खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि कॅरमच्या क्षेत्रातील दिवंगत कासम शेख यांच्या योगदानाच्या आठवणी जिवंत ठेवणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

No comments