देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी विशेष ट्रेनच्या प्रवासाला मुदतवाढ जळगांव प्रतिनिधी : लियाकत शहा (संपादक : हेमकांत गायकवाड) शेतकरी आणि प्रव...
देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी विशेष ट्रेनच्या प्रवासाला मुदतवाढ
जळगांव प्रतिनिधी : लियाकत शहा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
शेतकरी आणि प्रवाशांची सोय तसेच वाढती प्रवासी मागणी लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने देवळाली-दानापूर दरम्यान धावणाऱ्या "शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष ट्रेन"च्या प्रवासाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे:
ट्रेन क्रमांक ०१०५३ देवळाली - दानापूर शेतकरी समृद्धी विशेष ट्रेनच्या प्रवासाला १२.०९.२०२६ पासून १९.०९.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक ०१०५४ दानापूर - मनमाड शेतकरी समृद्धी विशेष ट्रेनच्या प्रवासाला १४.०९.२०२६ पासून २१.०९.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा रचनेत कोणताही बदल नाही. अधिक माहितीसाठी, प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या विशेष रेल्वे सेवेचा पुरेपूर लाभ घेण्याची विनंती केली आहे.

No comments