adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

काटेजवळगा येथे तीन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी तातडीने पंचनामा करून मदतीची मागणी

काटेजवळगा येथे तीन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी तातडीने पंचनामा करून मदतीची मागणी लातूर, जि. प्र. (उत्तम माने ) (संपादक : हेमकांत गायकवाड) नि...

काटेजवळगा येथे तीन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

तातडीने पंचनामा करून मदतीची मागणी



लातूर, जि. प्र. (उत्तम माने )

(संपादक : हेमकांत गायकवाड)


निलंगा :- दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता असतानाही मोठ्या कष्टाने जपलेला तीन एकर ऊस अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना काटेजवळ शिवारात घडली. या आगीत प्रशांत लांबोटे यांच्या सर्व्हे नंबर ७० मधील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला असून, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी गावचे सरपंच शरद सोमवंशी यांनी तात्काळ भेट देऊन शेतकऱ्याला धीर दिला काटेजवळगा यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेती करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. उपलब्ध पाण्यावर आणि मोठ्या मेहनतीने लांबोटे यांनी ऊसाचे पीक जोपासले होते. मात्र, पीक ऐन काढणीच्या टप्प्यात असताना आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे.

आग नेमकी कशामुळे लागली, 

याबाबत अद्याप स्पष्टता नसून अज्ञात व्यक्तीने ऊस पेटविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महसूल व संबंधित प्रशासनाने घटनास्थळी तातडीने पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि बाधित शेतकऱ्याला शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

तसेच ऊस जाळण्यामागील कारणाचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

No comments