adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महानगरपालिकेने किरकोळ व्यावसायिकांच्या नुकसानीची भरपाई करावी": सुमय्या अली

महानगरपालिकेने किरकोळ व्यावसायिकांच्या नुकसानीची भरपाई करावी": सुमय्या अली अकोला प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) अकोला - गेल्या क...

महानगरपालिकेने किरकोळ व्यावसायिकांच्या नुकसानीची भरपाई करावी": सुमय्या अली




अकोला प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


अकोला - गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. यामध्ये असे दिसून आले आहे कि, जे किरकोळ व्यावसायिक आहेत त्यांच्या हातगाड्यांवर (ठेल्यांवर) बुलडोझर चालवून त्या पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या मालाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.याच पार्श्वभूमीवर, आज 'नारी शक्ती सेवा फाउंडेशन'च्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमय्या अली आणि त्यांच्या पथकाने महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी आयुक्तांकडे हातगाडी चालकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली. तसेच, या हातगाडी चालकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून हे लोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकतील, असेही त्यांनी सांगितले त्या, देशात महागाई आणि बेरोजगारीमुळे तरुण त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाने हातगाडी/छोट्या व्यावसायिकांसाठी पर्यायी व्यवस्था करून द्यावी आणि त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल अशी कारवाई भविष्यात करू नये, असे त्यांना सांगण्यात आले.आयुक्त साहेबांनी लवकरात लवकर समस्येवर काहीतरी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आणि सुमय्या अली यांना नागरिकांशी बोलून मनपा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यास सांगितले.

No comments