कोचूर येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता: सावदा पोलिसांत गुन्हा दाखल! सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सावदा लगतच्या को...
कोचूर येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता: सावदा पोलिसांत गुन्हा दाखल!
सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा लगतच्या कोचूर बु. येथील पानटपरी चालक हर्षल विलास महाजन वय २७ वर्षे हा तरुण २९ ऑगस्ट ला सायंकाळपासून घरातून पानटपरीवर जाऊन येतो असे सांगून बाहेर पडलेला तरुण बेपत्ता झाला आहे
हर्षल घरी परतून न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून न आल्याने हर्षल महाजन च्या आई नंदाबाई विलास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हर्षल चा काही एक शोध न लागल्याने अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याचे जबरदस्तीने किंवा फसवणुकीच्या मार्गाने हर्षल चे अपहरण केले असल्याचे संशयावरून फिर्याद नोंदविली आहे त्यानुसार सावदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बेपत्ता हर्षल महाजन याचा बांधा सडपातळ असून त्याची उंची सुमारे ५ फूट ११ इंच आहे. त्याचा रंग सावळा असून चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे बारीक, केस काळे आणि कान मोठे आहेत. तो बेपत्ता होताना फुलबाहींचा पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि निळ्या रंगाच्या चपला परिधान करून घराबाहेर पडला होता. त्याच्या गळ्यात तसेच हातात दोरा बांधलेला आहे.
हर्षलकडे मोटोरोला कंपनीचा G-96 मोबाईल असून त्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या मोबाईलसह उपलब्ध माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे या प्रकरणाचा तपास सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ विनोद बळीराम पाटील करीत आहेत. हर्षल महाजन या बेपत्ता तरुणाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास सावदा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे

No comments