adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महापालिका हॉस्पिटला मोफत वैद्यकीय साहित्य, शाळांना साहित्य व सॅनिटरी नॅपकिन वाटप.... प्लेज फांउडेशन व समाजसेविका रूचिता नाईक यांच्या कार्याचे महापौर अजीव पाटील यांच्या कडुन कौतुक...

  महापालिका हॉस्पिटला मोफत वैद्यकीय साहित्य, शाळांना साहित्य व सॅनिटरी नॅपकिन वाटप....  प्लेज फांउडेशन व समाजसेविका रूचिता नाईक यांच्या कार्...

 महापालिका हॉस्पिटला मोफत वैद्यकीय साहित्य, शाळांना साहित्य व सॅनिटरी नॅपकिन वाटप.... 

प्लेज फांउडेशन व समाजसेविका रूचिता नाईक यांच्या कार्याचे महापौर अजीव पाटील यांच्या कडुन कौतुक.... 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:-- हेमकांत गायकवाड)

नालासोपारा ता, ४:- महापालिकेचा नागिनदास हॉस्पिटल येथे रूग्णांना उपचारा करिता वैद्यकीय साहित्यांचा अभाव असल्याने मदतीसाठी बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक यांच्या कडे मागणी करताच प्लेज फांउडेशन च्या मदतीने महापालिकेच्या नागिनदास हॉस्पिटल ला मोफत बीपी तपासण्याचे मशिन व ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर मशिन भेट देण्यात आले. रुग्णसेवेसाठी अत्यंत आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य रुग्णालयाला भेट दिल्यामुळे गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. मदतीमुळे गरजूंना वेळेवर उपचार मिळण्यास मोठी मदत होईल. रुग्णांना मोफत सुविधा मिळावी तसेच प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी रुग्णालयाला विविध साहित्य भेट देण्यात आले. प्लेज फांउडेशन व समाजसेविका रूचिता नाईक यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नालासोपारातील सोपारा इंग्लिश स्कूल व तुळींज जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यीनींना मोफत साहित्य व सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले.

शाळांमध्ये मुलींसाठी सॅनेटरी पॅड्स असणे अत्यंत गरजेचे़ असते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अनेक मुली शाळेत जाणं टाळतात. कारण कित्येक शाळांमध्ये  साधनांची उपलब्धता नसते. हेच गांभीर्य ओळखून आज सोपारा इंग्लिश स्कूल व तुळींज जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत सॅनेटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात आले. व लवकरच विद्यार्थ्यानसाठी कॉम्प्युटर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रूचिता नाईक यांनी सांगितले.  शाळा आणि हॉस्पिटल (रुग्णालय) यांना उपयोगी पडणारे साहित्य भेट देणे हा एक अत्यंत कौतुकास्पद आणि सामाजिक बांधिलकी जपणा रा उपक्रम आहे. अशा प्रकारच्या दानामुळे गरजू विद्यार्थी आणि रुग्णांना थेट मदत होईल असे कौतुक महापौर अजीव पाटील यांनी केले. या कार्यक्रमास बहुजन विकास आघाडीचा रूचिता नाईक, प्लेज फांउडेशन ते अँलेक्स डेनियल, श्रुती कोटीयन,दर्शन उपस्थित होते.

No comments