adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगरमध्ये अनैतिक देहव्यापारावर LCB चा छापा; दोन पीडित महिलांची सुटका

अहिल्यानगरमध्ये अनैतिक देहव्यापारावर LCB चा छापा; दोन पीडित महिलांची सुटका  सचिन मोकळं, अहिल्यानगर (संपादक : हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर : श...

अहिल्यानगरमध्ये अनैतिक देहव्यापारावर LCB चा छापा; दोन पीडित महिलांची सुटका 


सचिन मोकळं, अहिल्यानगर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर : शहरातील संजीवनी कॉलनी, पानसरेवाडा, रेल्वेस्टेशन परिसरात सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. या प्रकरणी आरोपी महिला झिनत फैय्याजअली महंमद (वय 44) हिच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. पोउपनि संदिप दरवडे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला.

घरातून दोन महिला आढळून आल्या. आरोपी महिला ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना अनैतिक देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं. 845/2026 अन्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

No comments