शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हेमंत भामरे यांची ‘Nation Builder Award’ साठी निवड शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमकांत ग...
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हेमंत भामरे यांची ‘Nation Builder Award’ साठी निवड
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विटनेर, ता. चोपडा : शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जि. प. प्राथमिक शाळा, विटनेरचे शिक्षक श्री. हेमंत रघुनाथ भामरे यांचे ‘Nation Builder Award’ साठी नामांकन करण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विटनेर ग्रामस्थ, सहकारी शिक्षक व शिक्षण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी श्री. भामरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून त्यांना सुजाण, जबाबदार व सक्षम नागरिक बनविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
या पुरस्काराच्या निमित्ताने शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता रोटरी भवन, हरेश्वर कॉलनी, चोपडा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. संजय बारी यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या गौरव सोहळ्यास विटनेर गावातील ग्रामस्थ, घोडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. हेमंत पाटील, सहकारी शिक्षक बांधव, अंगणवाडी ताई व मदतनीस, स्वयंपाकी ताई व मदतनीस तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली. आपल्या या सन्मानाबद्दल श्री. हेमंत भामरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शिक्षकाच्या कार्याला मिळालेली ही पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments