adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उमेदच्या ग्रामसखींचे ऑनलाइन काम बंद आंदोलन प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी; आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना निवेदन

  उमेदच्या ग्रामसखींचे ऑनलाइन काम बंद आंदोलन प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी; आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना निवेद...

 उमेदच्या ग्रामसखींचे ऑनलाइन काम बंद आंदोलन

प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी; आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना निवेदन 


 अशोक कोळी चोपडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या महिला केडरच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ऑनलाइन काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णासाहेब प्रा.चंद्रकांतजी सोनवणे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, ग्रामसखी व प्रभाग स्तरावर कार्यरत केडरच्या विविध मागण्यांबाबत शासन स्तरावर चर्चा होऊनही अद्याप ठोस शासन निर्णय झालेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे २४ ऑगस्ट २०२६ पासून पुढील १५ दिवस किंवा मागण्यांबाबत शासन निर्णय होईपर्यंत ऑनलाइन काम बंद ठेवण्याचा निर्णय राज्य संघटनेने घेतला आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये ग्रामसखींच्या कायमस्वरूपी अपंगत्व, नैसर्गिक मृत्यू किंवा अपघाती मृत्यूच्या प्रसंगी त्यांच्या वारसांना १० लाख रुपयांचा विमा अथवा सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासन निर्णय तातडीने काढावा, तसेच मागील काही महिन्यांत मृत्यू झालेल्या ग्रामसखींच्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


तसेच ऑनलाइन कामासाठी योग्य प्रकारे चालणारे टॅब उपलब्ध करून द्यावेत, ऑनलाइन कामासाठी अतिरिक्त मानधन द्यावे, प्रलंबित वाढीव मानधन तातडीने अदा करावे, ग्रामसखींचे मासिक मानधन १५ हजार रुपये आणि प्रभाग संघ स्तरावरील केडरचे मानधन २४ हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय प्रवास भत्ता, अतिरिक्त कामाचे मानधन, त्रैमासिक ग्रेडेशन, उमेद कक्षाला ग्रामविकास विभागाचा कायमस्वरूपी उपविभाग म्हणून मान्यता, तसेच प्रभाग समन्वयक व सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या यांसह विविध मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.

जोपर्यंत शासन स्तरावरून मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत ऑनलाइन काम बंद ठेवण्यात येईल, अशी भूमिका संघटनेने निवेदनातून स्पष्ट केली आहे. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती संघटनेने केली आहे. तसेच उपस्थित संगीता रवींद्र इंगळे सुनिता सोनवणे आरती अमृतकर मंगला पाटील सुनिता पाटील अलका कोळी मंगला ठाकरे वैशाली बारेला सुनंदा शिरसाट दीपमाला पाटील सपना पाटील आशा पाटील दीपिका कोळी जय माला पाटील अंजली कोळी सुलभा पाटील रंजना बारेला आणि सर्व महिला मंडळांनी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे राखी बांधून सण साजरा  केला आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी महिला मंडळींना आश्वासनही दिले तात्काळ आपल्या अडचणी सोडवण्यात येईल असे यावेळी आमदारांनी महिला मंडळांना राखी बांधून त्यांना शुभेच्छा ही दिल्या काही मान्यवर महिलाही उपस्थित होते

No comments