adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोणवडी गावात SIR अंतर्गत पूर्ण मतदार यादी जाहीर

  लोणवडी गावात SIR अंतर्गत पूर्ण मतदार यादी जाहीर   मलकापूर प्रतिनिधी अमोल बावस्कर   (संपादक : हेमकांत गायकवाड) मलकापूर : SIR (Special Inten...

 लोणवडी गावात SIR अंतर्गत पूर्ण मतदार यादी जाहीर




 मलकापूर प्रतिनिधी अमोल बावस्कर 

 (संपादक : हेमकांत गायकवाड)

मलकापूर : SIR (Special Intensive Revision) अंतर्गत लोणवडी गावाची पूर्ण मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, गावातील पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये मतदाराचे नाव, वय, लिंग, मतदार क्रमांक तसेच संबंधित मतदान केंद्राची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपले नाव यादीत आहे की नाही, तसेच नाव, पत्ता व इतर तपशील योग्य आहेत की नाही, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे.मतदार यादीमध्ये नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता, वय अथवा इतर तपशीलामध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित नियमांनुसार दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे किंवा आवश्यक बदलासाठी अर्ज करता येणार आहे.लोणवडी गावातील नागरिकांनी आपले मतदानाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी मतदार यादी तपासून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीतील नावाची खात्री करणे आवश्यक आहे.

“मतदार यादी तपासा, आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा!”

No comments