अहिल्यानगरमध्ये दि.6 रोजी रंगणार 'गोल्डन मेलेडी'चा सूरमयी नजराणा 'माऊली सभागृहात' मंगळवार दि. 6 ऑक्टोबर रोजी भव्य संगीत म...
अहिल्यानगरमध्ये दि.6 रोजी रंगणार
'गोल्डन मेलेडी'चा सूरमयी नजराणा
'माऊली सभागृहात' मंगळवार दि. 6 ऑक्टोबर रोजी भव्य संगीत मैफल !
शौकतभाई शेख / श्रीरामपूर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर - संगीत प्रेमींसाठी एक खास पर्वणी घेऊन वैदेही बल्लाळ यांची हार्मनी म्युझिक्स घेऊन येत आहेत 'गोल्डन मेलेडी' लाईव्ह म्यूझिक आर्केस्ट्रा भाग पहिला, मंगळवार 6 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता अहिल्यानगर येथील माऊली सभागृहात ही भव्य संगीत मैफल पार पडणार आहे.
या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील लोकप्रिय गायक कुशलकुमार जैन आणि अनिरुद्ध वरणगांवकर यांच्यासह अहिल्यानगरचे गुणी गायक देवदत्त पाऊलबुद्धे, सुमित वर्मा, निलेश महाजन, सारंग पंधाडे, महेश घावटे, मोहसीन सैफी, एस्तर पवार, विद्या तंन्वर आणि वैदेही बल्लाळ आपल्या बहारदार गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
प्रसिद्ध संगीत संयोजक दीपक काळे यांच्या संगीताच्या तालावर दिलावर शेख, अमर वानखेडे, रितिक साटम, अमित बरुवा, हर्षद गणबोटे आणि सिद्धांत गायकवाड हे उत्कृष्ट वादक साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रमाचे रसाळ आणि बहारदार निवेदन प्रसिद्ध निवेदक प्रदीप कुलकर्णी करणार असून, पुणे येथील 'गौतम साऊंड लाईट'ची उत्तम ध्वनी आणि प्रकाश योजना या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
अहिल्यानगर मधील संगीत प्रेमींनी या सुरेल कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्ध गायिका आणि निवेदिका वैदेही बल्लाळ आणि सहकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी पास आवश्यक असुन अधिक माहितीसाठी व पासेससाठी 8411839386 आणि
9226623598 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आयोजकांतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111

No comments