महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त चोपड्यात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा...
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त चोपड्यात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा :दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा भैय्यासाहेब ॲड संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा, शांतता आणि बंधुभाव या विचारांचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांचे आचरण करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या अमूल्य योगदानाला उजाळा देऊन महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक एकता, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.
माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेच्या कार्याचेही स्मरण करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष मोहन पाटील, शहराध्यक्ष अशोक साळुंखे,जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर सांगोरे, मधुकर बाविस्कर ,दिलीप साळुंखे, छन्नू पाटील ,माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील ,विकास पाटील, डॉ रवींद्र कदम, नगरसेवक रमाकांत ठाकूर, युवराज पाटील ,राजेंद्र पाटील ,देविदास साळुंखे ,नगरसेवक अमोल पाटील, रमाकांत सोनवणे ,शांताराम लोहार, सुधाकर बाविस्कर, प्रवीण जैन ,शैलेश वाघ, सुरेश तुकाराम पाटील, देशमुख सर,दीपक चौधरी ,गोवर्धन पाटील, माणिक पाटील ,प्रताप सोनवणे ,सारंग महाजन, श्याम दादा, इलियाज पटेल. आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments