adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

परिस्थितीवर मात करत ॲड.आकाश जाधव यांची B.A.LL.B. पदवीला गवसणी; वाढदिवशी सत्कार सोहळ्याने आनंद द्विगुणित ! JD महाराष्ट्र NEWS च्या मुख्य संपादिका किरणताई जाधव यांच्या पुढाकारातून सत्कार सोहळा उत्साहात संपन्न; मातोश्रींच्या नयनी आनंदाश्रू !

  परिस्थितीवर मात करत ॲड.आकाश जाधव यांची B.A.LL.B. पदवीला गवसणी; वाढदिवशी सत्कार सोहळ्याने आनंद द्विगुणित ! JD महाराष्ट्र NEWS च्या मुख्य सं...

 परिस्थितीवर मात करत ॲड.आकाश जाधव यांची B.A.LL.B. पदवीला गवसणी; वाढदिवशी सत्कार सोहळ्याने आनंद द्विगुणित !

JD महाराष्ट्र NEWS च्या मुख्य संपादिका किरणताई जाधव यांच्या पुढाकारातून सत्कार सोहळा उत्साहात संपन्न; मातोश्रींच्या नयनी आनंदाश्रू !





शिर्डी / सावळीविहीर प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


ॲड.आकाश [भाऊसाहेब] दीपमाला गोरख जाधव यांनी B.A.LL.B. ही कायद्याची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. JD महाराष्ट्र NEWS चॅनलच्या मुख्य संपादिका तथा ॲड. आकाश यांच्या भगीनी किरणताई जाधव यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, याच दिवशी ॲड.आकाश भाऊसाहेबांचा वाढदिवस असल्याने सत्कार आणि वाढदिवस अशा दुहेरी आनंदाने हा सोहळा साजरा करण्यात आला.


या आनंदाच्या क्षणाची सुरुवात ३० सप्टेंबर रोजीच झाली होती. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ॲड.आकाश भाऊसाहेबांनी आपल्या आईला मातोश्रींना फोन करून निकाल लागल्याची आनंदवार्ता दिली आणि निकालाची मार्कशीट व्हॉट्सॲपवर पाठवली. मुलाने B.A.LL.B. परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवल्याचे समजताच मातोश्रींचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुलाच्या यशाची बातमी ऐकताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. आईसाठी हा क्षण केवळ निकालाचा नव्हता, तर मुलाच्या मेहनतीचे आणि स्वप्नपूर्तीचे समाधान देणारा होता.


ॲड.आकाश भाऊसाहेबांचा प्रथम श्रेणीतील निकाल आणि ५ ऑक्टोबर रोजी असलेला त्यांचा वाढदिवस, या दोन्ही आनंदाच्या प्रसंगांचे औचित्य साधून भगीनी किरणताई जाधव यांनी अत्यंत कमी वेळेत सत्कार समारंभाचे आयोजन केले. आपल्या भावाच्या शैक्षणिक यशाचा गौरव व्हावा आणि हा आनंद कुटुंबीय, मित्रपरिवार व मान्यवरांसोबत साजरा करता यावा, या भावनेतून त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे हा सोहळा जाधव परिवारासाठी आगदी अविस्मरणीय असाच ठरला.


कायद्याच्या क्षेत्रात आपली कारकीर्द घडवण्याच्या दिशेने वाटचाल करताना ॲड. आकाश भाऊसाहेबांनी दिल्ली येथील सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस केली आहे. आता पुढील व्यावसायिक वाटचालीत ते मुंबई येथे कार्यरत असणार आहेत. त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे जाधव परिवारासह मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या कार्यक्रमास शिर्डीचे नगरसेवक निलेश दादा कोते पा., नगरसेवक रवी तात्या गोंदकर पा., नगरसेविका नीलमताई सोळंकी, अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषद, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब जपे पाटील, पत्रकार राजेंद्र दुनबळे, गणेश आगलावे, स्वप्निल पारडे, गणेश बनसोडे, गणेश खैरे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश शिंदे, नानासाहेब शिंदे, कैलास शेजवळ, मुश्ताकभाई तांबोळी, साहिल जाधव, सुमीत बनकर, तुषार काटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून ॲड. आकाश भाऊसाहेबांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत होताना समाजातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा, अशा सदिच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक विकास साळवे यांच्या गीतगायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या गीतगायनामुळे सोहळ्याला सांगीतिक रंगत आली आणि उपस्थितांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.


कार्यक्रमादरम्यान ॲड. आकाश भाऊसाहेबांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या आनंदासोबतच शैक्षणिक यशाचा गौरव झाल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांनी ॲड. आकाश जाधव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नातेवाईकांनी विविध प्रकारच्या भेटवस्तू देत ॲड. आकाश भाऊसाहेबांवरील प्रेम आणि आपुलकी व्यक्त केली. शुभचिंतक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या या भरभरून शुभेच्छांमुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.

यावेळी जाधव परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.


*बहिणीच्या पुढाकारातून भावाच्या यशाचा गौरव, मातेच्या च्या नयनी आनंदाश्रू, सुप्रसिद्ध गायकाच्या गीतगायनाची रंगत आणि मान्यवरांच्या शुभेच्छांची साथ अशा भावनिक व उत्साही वातावरणात हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.*

JD महाराष्ट्र NEWS चॅनलच्या मुख्य संपादिका तथा ॲड.आकाश यांच्या भगिनी किरणताई जाधव यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्यांनी प्रभावीपणे केले.


ॲड.आकाश जाधव यांच्या शैक्षणिक यशाचा आणि वाढदिवसाचा आनंद सावळीविहीर ते शिर्डीपर्यंत पाहायला मिळाला. ॲड.आकाश भाऊसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी शुभचिंतक आणि मित्रपरिवाराच्या वतीने सावळीविहीर गावापासून शिर्डीपर्यंत विविध ठिकाणी शुभेच्छांचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते. या माध्यमातून मित्रपरिवार आणि शुभचिंतकांनी त्यांच्याविषयीचा जिव्हाळा व्यक्त करत त्यांच्या यशाचे कौतुक केले. परिसरात त्यांच्या यशाची आणि वाढदिवसाची विशेष चर्चा रंगली असल्याचे बघावयास मिळाले.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111

No comments