adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भास्कर पाटील यांचा चोपडा नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोरोले यांच्या हस्ते सत्कार

  भास्कर पाटील यांचा चोपडा नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोरोले यांच्या हस्ते सत्कार    शामसुंदर सोनवणे वि  प्रतिनिधी (संपादक : ह...

 भास्कर पाटील यांचा चोपडा नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोरोले यांच्या हस्ते सत्कार 

 


शामसुंदर सोनवणे वि प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड) 

चोपडा : जिल्हा परिषद मराठी शाळा, कमळगाव येथे कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक भास्कर शंकरराव पाटील यांना ‘शैक्षणिक दीपस्तंभ, पुणे’ यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल घेत विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमांचा समावेश ‘शिक्षकरत्न’ विशेषांकातील प्रेरणादायी यशोगाथेत करण्यात आला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल चोपडा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष भैय्यासाहेब पंकज बोरोले यांच्या हस्ते भास्कर पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष पंकज बोरोले यांनी, “भास्कर पाटील हे विविध शैक्षणिक उपक्रम राबविणारे आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले मेहनती व उपक्रमशील शिक्षक आहेत,” असे गौरवोद्गार काढले. याप्रसंगी भास्कर पाटील यांचे मार्गदर्शक विनोद धनगर सर, पंकज महाविद्यालय, चोपडा येथील डॉ. गिर्हे सर तसेच जगन्नाथ चौधरी उपस्थित होते. राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव झाल्याबद्दल शिक्षक भास्कर पाटील यांचे विविध स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.

No comments