adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पिंपरुड–सावदा मार्गावर पहाटे खळबळ; आई-वडिलांना मारहाण, तरुणीला कारमधून नेल्याचा आरोप !

  पिंपरुड–सावदा मार्गावर पहाटे खळबळ; आई-वडिलांना मारहाण, तरुणीला कारमधून नेल्याचा आरोप ! मोटारसायकलला चारचाकीची धडक देत तरुणीला जबरदस्तीने न...

 पिंपरुड–सावदा मार्गावर पहाटे खळबळ; आई-वडिलांना मारहाण, तरुणीला कारमधून नेल्याचा आरोप !

मोटारसायकलला चारचाकीची धडक देत तरुणीला जबरदस्तीने नेल्याची तक्रार; तिघांविरोधात सावदा पोलिसांत गुन्हा

 मुबारक तडवी रावेर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

 रावेर तालुक्यातील पिंपरुड–सावदा रस्त्यावर गुरुवारी (दि. ८ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास घडलेल्या कथित घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आई-वडिलांसोबत मोटारसायकलवरून भुसावळकडे निघालेल्या २४ वर्षीय तरुणीला चारचाकी वाहनातून जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. यावेळी तरुणीच्या आई-वडिलांना मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रवास

तक्रारीनुसार, संबंधित तरुणीचा यापूर्वी रोझोदा येथील टेकचंद रविंद्र सरोदे याच्यासोबत विवाह झाला होता. या विवाहासंदर्भात न्यायालयीन वाद सुरू असून, उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी तरुणी आपल्या आई-वडिलांसह भुसावळकडे जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

वळणावर मोटारसायकलला धडक

पिंपरुड–सावदा मार्गावरील स्मशानभूमीजवळील वळणाच्या परिसरात त्यांच्या मोटारसायकलला मागून ग्रे रंगाच्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याचा आरोप आहे. धडकेनंतर वाहनातून तीन व्यक्ती खाली उतरल्या. त्यापैकी दोन जणांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते, तर टेकचंद सरोदे याचा चेहरा उघडा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर तरुणी तसेच तिच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तरुणीला जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तिने प्रतिकार केल्यानंतर तिच्यावर मारहाण करण्यात आली, असा आरोप आहे.

मुलीला वाचवताना आईलाही मारहाण

मुलीला वाचविण्यासाठी आई पुढे गेल्यानंतर तिच्याशीही झटापट करून चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेदरम्यान तिचे सोन्याचे मंगळसूत्र तुटून पडल्याचेही सांगण्यात आले आहे.

सावदा पोलिसांकडून तपास सुरू

घटनेनंतर तरुणीच्या आई-वडिलांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, टेकचंद सरोदे याच्यासह एकूण तीन जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गणेश पांडुरंग फड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे. तरुणीचा शोध घेण्यासोबतच संशयित व्यक्ती आणि कथित घटनेत वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

टीप : वरील वृत्तातील आरोप हे पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर आधारित आहेत. घटनेबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

No comments