यावल येथे श्री जिवा महाले जयंती उत्साहात साजरी भरत कोळी यावल [संपादक हेमकांत गायकवाड] यावल, दि. ९ ऑक्टोबर २०२६ : यावल शहरात आज शुक्रवार,...
यावल येथे श्री जिवा महाले जयंती उत्साहात साजरी
भरत कोळी यावल
[संपादक हेमकांत गायकवाड]
यावल, दि. ९ ऑक्टोबर २०२६ : यावल शहरात आज शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी श्री जिवा महाले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री जिवा महाले यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. शशिकांत लोटूशेठ वारूळकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री जिवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्था, यावल व दुकानदार संघटनेच्या वतीने जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल चौधरी यांनी श्री जिवा महाले यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यात जिवा महाले यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका आणि निष्ठा यांचे स्मरण करून दिले. ‘होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी’ हे ब्रीदवाक्य आजही देशभरात बुलंद आवाजात अभिमानाने घेतले जाते. जिवा महाले यांचे शौर्य, स्वामिनिष्ठा आणि पराक्रम हा समाजासाठी प्रेरणादायी वारसा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. अनिल चौधरी, श्री. योगेश वारूळकर, श्री. अनंता चौधरी, श्री. राजेंद्र चौधरी, श्री. सुपडू वारूळकर, श्री. तुषार सावखेडकर, श्री. दीपक सावळे, श्री. अशोक येवले, श्री. राहुल चौधरी, श्री. लक्ष्मण चौधरी आणि श्री. अमोल आमोदकर यांच्यासह उपस्थितांनी सहकार्य केले. यावेळी उपस्थितांनी श्री जिवा महाले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला

No comments