adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सात महिने एसटीचा पेट्रोल पंप बंद; निलंगा आगाराचा डिझेलसाठी आटापिटा !

  सात महिने एसटीचा पेट्रोल पंप बंद; निलंगा आगाराचा डिझेलसाठी आटापिटा !   लातूर, जि. प्र. (उत्तम माने )  (संपादक : हेमकांत गायकवाड) लातूरः- न...

 सात महिने एसटीचा पेट्रोल पंप बंद; निलंगा आगाराचा डिझेलसाठी आटापिटा !



  लातूर, जि. प्र. (उत्तम माने )

 (संपादक : हेमकांत गायकवाड)


लातूरः- निलंगा एसटी आगारातील पेट्रोल पंप गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्याने इंधनपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दररोज सुमारे २८ हजार किलोमीटर धावणाऱ्या ७१ बसगाड्यांसाठी सहा ते साडेसहा हजार लिटर डिझेल लागते. मात्र, आगारातच इंधन भरण्याची व्यवस्था बंद असल्याने औसा, लातूर आणि उदगीर येथून डिझेल भरावे लागत आहे. ४० वर्षांच्या आगारात इंधनासाठी दुसऱ्या ठिकाणांवर अवलंबून राहण्याची वेळ येणे, ही प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब आहे. १३ मार्च २०२६ रोजी आगारातील पेट्रोल पंपावर लागलेल्या आगीत वाहन परीक्षक बसवराज स्वामी गंभीररीत्या भाजले होते. उपचारादरम्यान १५ मार्च रोजी लातूर येथील खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेला सात महिने उलटूनही पेट्रोल पंप सुरू झालेला नाही. निलंगा-लातूर मार्गावर दररोज ८०, निलंगा-उदगीर मार्गावर ४२, तर निलंगा-उमरगा मार्गावर आठ फेऱ्या होतात. याशिवाय पुणे, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नांदेड, परभणी आणि गुलबर्गा येथेही बसगाड्या धावतात. या मोठ्या वाहतूक व्यवस्थेसाठी इंधनपुरवठ्याची कायमस्वरूपी व्यवस्था अद्याप पूर्ववत झालेली नाही. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आगाराकडून संबंधित कार्यालयाला लेखी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पुढील कार्यवाहीअभावी पंप बंद माहिती असल्याची आगारप्रमुख मिथुन राठोड यांनी दिली. कंपनीची नेमकी कोणती कार्यवाही प्रलंबित आहे आणि पंप सुरू होण्यासाठी आणखी किती वेळ लागणार, याचे उत्तर अद्याप स्पष्ट नाही. फेब्रुवारी १९८६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा बसस्थानक व आगाराचे उद्घाटन झाले होते. आज ४० वर्षांनंतरही इंधनपुरवठ्याचा प्रश्न सात महिन्यांपासून कायम आहे. पर्यायी ठिकाणांहून डिझेल भरताना लागणारा अतिरिक्त वेळ, अंतर आणि खर्च याबाबतही प्रशासनाने स्पष्टता द्यावी. प्रवाशांची गैरसोय होण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे! इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने प्रलंबित कार्यवाही तातडीने पूर्ण करून पेट्रोल पंप सुरू करावा आणि एसटी प्रशासनाने इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. सात महिन्यांपासून बंद असलेला पंप आणखी किती दिवस बंद राहणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

No comments