गीतांजली व्यवहारे हिचे वक्तृत्व स्पर्धेत दुहेरी यश श्रीरामपूर / प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) येथील डी.डी. काचोळे माध्यमिक विद्या...
गीतांजली व्यवहारे हिचे
वक्तृत्व स्पर्धेत दुहेरी यश
श्रीरामपूर / प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
येथील डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी गीतांजली शितल शरद व्यवहारे हिने सेवा संकल्प अभियानांतर्गत पंचायत समिती श्रीरामपूर येथे पार पडलेल्या वकृत्व स्पर्धेत व नगरपालिका श्रीरामपूर अंतर्गत संपन्न झालेल्या वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवत दुहेरी यश संपादन केले.
'माझ्या स्वप्नातील भारत' या विषयावर तिने इंग्रजी भाषेत मनोगत व्यक्त केले. ग्रामीण व शहरी भागात प्रथम क्रमांक पटकावून आपल्या वकृत्व कौशल्याचा ठसा उमटवला. गीतांजली हिस सुनील खाडे व निरंजनी भुजबळ या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
पंचायत समिती शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख शितल गायकवाड यांची गीतांजली ही कन्या आहे.
गीतांजली हिच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य प्रकाश पाटील निकम, गटशिक्षण अधिकारी दीपक त्रिभुवन, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक सूर्यकांत सराटे, वसतिगृहाचे अधीक्षक महेंद्र भराड आदींनी गीतांजली व तिच्या पालकांचे कौतुक व अभिनंदन केले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments